Post Traumatic Stress Disorder in marathi. Inspirational videoभूतकाळात घडलेल्या अनेक घटना आम्ही खांद्यावर बाळगीत फिरत असतो. कधी संकटाच्या, कधी वियोगाच्या.
स्मरण ही जशी शक्ती तसा शापही. जगात स्मरणाची जेवढी आवश्यकता आहे तेवढीच विस्मरणाची गरज.
आनंददायी गोष्टींपेक्षा क्षोभकारक घटना आठवण्याचं प्रमाण जास्त, ते तीव्र भावनांमुळे. आम्हीही भूतकाळाची ही देणी उधारी दिल्यासारखी लक्षात ठेवतो. क्लेशदायक आठवणी विसरता येत नाहीत, मात्र त्यांची तीव्रता कमी करता येणं शक्य आहे. घटना बदलता येत नाहीत, त्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलता येणं शक्य आहे.
खांद्यावर बाळगलेल्या अप्रिय आठवणींचे खाली उतरवा. त्यासाठी त्यांना नवे, सुसह्य संदर्भ द्या. दुःखांना स्वीकृतीची, क्रोधाला आत्मपरीक्षणाची, आणि अपयशाला आत्मसंम्मानाची जोड द्या.
माणसानं भूतकाळात मुक्काम ठोकू नये, फेरफटका तेवढा मारावा.

Source: Youtube